PVTG

About PVTG

About PVTG

दि. 1 जून 2022 पासून युनिसेक संचालित तीन सूक्ष्म नियोजन केंद्रांचे काम शहापुर, यवतमाळ, व गडचिरोली येथे सुरु झाले आहे. प्रकल्पाचा कालावधी 12 महिने आहे. मा. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे आदेशाने प्रकल्पास सुरुवात झाली असुन सहआयुक्त, संचालक(PVTG), लेखा अधिकारी, संशोधन अधिकारी व प्रकल्प संचालक यांचे मंडळ प्रकल्पास वेळोवेळी मार्गदर्शन करेल व प्रकल्पाच्या गतिविधी बाबत राज्याचे संसाधन केंद्र संचालक यांचे कडून प्रकल्पाचे प्रगतीचा आढावा घेईल.

Functioning Structure of PVTG

Functioning Structure of PVTG

केंद्र स्तरावर संसाधन केंद्र समन्वयक प्रमुख असून त्याचे अधीनस्थ प्रशिक्षण देण्यासाठी दोन मास्टर ट्रेनर, समुदायास प्रकल्पानुकूल करण्यासाठी दोन कम्युनिटी मोबिलायझर, क्रुषी व क्रुषी उत्पादनांचे मार्केटींग सुरळित व्हावे म्हणून एक अ‍ॅग्री मार्केटींग सल्लागार, PVTG ना व्यवसायाचे धोरण ठरवण्यास व सुरु करण्यास मदत करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी व ऑपरेशन सल्लागार, वनहक्क व पेसा कायद्यातील बारकावे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी एक कायदा सल्लागार, आणि या सर्वांच्या कामामधून जो डेटा मिळेल तो प्रोसेस करून निष्कर्षाप्रत आणता यावा यासाठी एक आय.टी. सल्लागार अशी परिपूर्ण टीम असेल. केंद्राचे प्रशासन सुरळित चालावे याकरिता युनिसेक ने एका प्रशासकीय सहायकाची नियुक्ती केली आहे.

Scope of Work

Scope of Work

प्रकल्पामधील सर्व पंधरा घटक कार्यक्रम राबविण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात बेंच मार्क सर्व्हे सुरु केला असून या साठी प्रत्येक जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. बेंच मार्क सर्व्हेच्या निष्कर्षांवरुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल.

सविस्तर सर्व्हे करण्यासाठी तीनही केंद्रांच्या सहभागाने एक सर्वानुकूल प्रश्न पत्रिका तयार करून तीमध्ये सर्व घटकांवर आवश्यक ती माहिती भरुन घेण्यात येईल. टीम मधील प्रत्येकजण दोन – दोन घटकांचा सविस्तर सर्व्हे करेल जेणेकरुन सर्व्हेचे काम नियोजित वेळेत संपेल. आदिम जमाती संदर्भात विविध संशोधन प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे. या संशोधनावर आधारित आदिम जमातीचे विकास धोरण मसुदा तयार करण्यास मदत होईल. आदिम जमातीच्या संस्क्रुतीबाबत माहिती गोळा करुन संस्क्रुती व संवर्धन विषयक पुस्तिका तयार करण्यात येईल. आदिम जमातीच्या पारम्पारिक ज्ञानाची माहिती घेउन त्यावर पुस्तिका तयार करण्यात येईल. या शिवाय,घटकांवर आधारित नियमित प्रशिक्षण, मेळावे, प्रात्यक्षिके, व्यावसायिक मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील तज्ञांचे उद्बोधन असे विविध कार्यक्रम घेण्याचे प्रावधान आहे. तसेच, व्यावसायिकाना आर्थिक संस्थांशी आणि व्यापक स्तरावर मार्केटिंग संस्थांशी जोडणी करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सदर प्रकल्पामध्ये आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे जमातीचे दाखले प्राप्तीसाठी प्रस्ताव तयार करणे आणि जमात प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रस्ताव सादर करण्याचेही प्रयोजन आहे. आदिम जमातीना आजवर विविध योजनांद्वारे मिळलेला लाभ व त्यांची फलनिष्पत्ती यावर अहवाल तयार करण्यात येईल

अपेक्षित फलित

अपेक्षित फलित

वरील सर्व मिळालेल्या माहितीवरुन कातकरी, कोलाम व माडिया जमातींच्या विकासाचा आराखडा TRTI सोबत चर्चा करुन ठरविण्यात येईल.

बेंच मार्क सर्व्हे, शहापुर
प्रकल्पाचे घटक कार्यक्रम गावक-यांना बेंच मार्क सर्व्हेदरम्यान समजावून सांगताना केंद्र समन्वयक शहापुर
प्रकल्पाचे घटक कार्यक्रम गावक-यांना बेंच मार्क सर्व्हेदरम्यान समजावून सांगताना केंद्र समन्वयक, यवतमाळ आणि टीम
बेंच मार्क सर्व्हे, यवतमाळ
कोलाम सांस्क्रुतिक महोत्सव 2022, पांढरकवडा जि. यवतमाळ येथील प्रदर्शनी मधील सहभाग
कोलाम सांस्क्रुतिक महोत्सव 2022, पांढरकवडा जि. यवतमाळ येथील प्रदर्शनी मध्ये प्रकल्पाबद्दल माहिती देताना कम्युनिटी मोबिलायझर.

प्रकल्प संचालक TRTI, पुणे यांची तीनही केंद्राना भेट

अ. शहापुर केंद्र
ब. यवतमाळ केंद्र
क. गडचिरोली केंद्र

आदिम जमाती बहुल क्षेत्रात तीन सुक्ष्म नियोजन केंद्र उभारणी

आदिम जमाती बहुल क्षेत्रात तीन सुक्ष्म नियोजन केंद्र उभारणी

मुद्रणयोग्य आवृत्तीसाठी येथे क्लिक करा...

महाराष्ट्र राज्यात कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींचे वास्तव्य आहे. या जमाती शेती, वनउपज आणि विविध प्रकारची मजुरी यावर उपजिविका करतात. या समाजाच्या विविध समस्या व गरजा आहेत. सदर गरजा व समस्या आणि त्यांच्या विकासाच्या कल्पना लक्षात घेउन आदिम समाजाचा विकास गतिमान करणे आवश्यक झाले आहे. यासाठी विविध विकास घटकांची,सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक इत्यादि बाबींची सद्यस्थितीदर्शक माहिती संकलन व अहवाल निर्मिती, समस्यांची माहिती व त्या निवारणार्थ उपक्रम निश्चिती करणे या करिता, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) यानी राज्यामधील कातकरी, कोलाम व माडिया आदिवासी बहुल क्षेत्रात तीन सूक्ष्म नियोजन केंद्र उभारणीचे काम युनिसेक मॅनेजमेंट सर्विसेस प्रा. लि. या कंपनीस दिले आहे.

या प्रत्येक केंद्रांतर्गत प्रत्येक आदिम जमातीकरिता पुढीलप्रमाणे स्वतंत्र घटक कार्यक्रम राबविण्यात येतील.

  1. रोजगार, स्वयंरोजगार विषयक पाहणी करुन प्रभाग तालुकानिहाय रोजगार, स्वयंरोजगार आराखडा तयार करणे.
  2. युवा / महिला मंच, संस्था / कंपनी स्थापना व नोंदणी या करिता इच्छुक युवक, युवती, महिला यांना आवश्यक प्रशिक्षण देणे अथवा उपलब्ध करुन देणे.
  3. उपजीविका साधन विषयक अभ्यास व त्यानुसार अहवाल सादरीकरण.
  4. वनहक्क अधिनियम अंतर्गत जनजागरण मेळावा आयोजन, वनहक्क अंतर्गत कार्यरत कर्मचारी प्रशिक्षण, ग्रामस्तरावरील वनहक्क समिती सदस्य प्रशिक्षण.
  5. पेसा अधिनियम अम्मलबजावणी जनजागरण मेळावा आयोजन, पेसा क्षेत्रातील पंचायत राज लोकप्रतिनिधी प्रशिक्षण.
  6. क्षेत्र समन्वयक, ग्राम साथी प्रशिक्षण
  7. क्षेत्र समन्वयक, ग्राम साथी कामकाज मुल्यांकन
  8. आदिम जमाती संदर्भातील विविध संशोधन प्रकल्प हाती घेणे.
  9. सखोल संशोधनावर आधारित आदिम जमाती विकास धोरण मसुदा निर्मिती व सादरीकरण.
  10. संस्कृती व संवर्धन विषयक पुस्तिका तयार करणे.
  11. शैक्षणिक सद्यस्थिती व त्यामध्ये अपेक्षित सुधारणा विषयक अहवाल तयार करणे.
  12. आदिम जमातीच्या पारम्पारिक ज्ञानाचा अभ्यास करुन त्यावर पुस्तिका तयार करणे.
  13. शासकीय आश्रमशाळा / अनुदानित आश्रमशाळा / एकलव्य निवासी शाळा (EMRS) या मधील आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे दाखले प्राप्तीसाठी प्रस्ताव तयार करणे, सक्षम प्राधिकारी यांना सादर करणे त्याचप्रमाणे, प्राप्त जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सम्बंधित समितीस प्रस्ताव सादर करणे इत्यादि कामे सेवानिवृत्त अनुभवी कर्मचारी पथक गठित करुन त्यांचे मार्फत कामकाज करुन घेणे.
  14. आदिम जमाती समस्या संदर्भात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपक्रम निश्चिती विषयक कामकाज करणे.
  15. आदिम जमाती व्यक्ती व कुटुंबांना आजतागायत मिळलेला लाभ व त्याची फलनिष्पत्ती अहवाल निर्मिती
 

आदिम जमाती बहुल क्षेत्रात तीन सुक्ष्म नियोजन केंद्र उभारणी उद्घाटन सोहळा क्षणचित्रे...

 

अ. शहापूर केंद्र

उद्घाटन दिनांक 24/05/2022
उद्घाटक - मा. तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प शहापुर.
 

ब. यवतमाळ केंद्र

उद्घाटन दिनांक 25/05/2022
उद्घाटक - मा. श्री. गो.भा.सोनार, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन), एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा जि. यवतमाळ
 

क. गडचिरोली केंद्र

उद्घाटन दिनांक 27/05/2022
उद्घाटक - मा.श्री प्रभू सादमवार, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विभाग, गडचिरोली