शासन निर्णय शासकीय पुनर्वसन, समाज कल्याण, सांस्कृतिक बाबी, क्रीडा व पर्यटन विभाग, नाही टीआरआय -1076 / 45235 / डी-एक्सव्हीआय, डीटी. 9 मार्च 1979 व शासन निर्णयसामाजिक वेलफेरे, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि पर्यटन विभाग नाही टीआरआय 1079/35475 / डी. एक्स एक्स एक्स, मंत्रलय दिनांक 25 फेब्रुवारी 1980 अन्वये लेखाधिकारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले.
अनुदान वाटप स्तर
BEAMS या प्रणालीवर जमा होणारा शासन निधी खालीलपैकी कार्यालय प्रकल्प कार्यालय, शासकिय / निमशासकिय संस्था व समिती कार्यालयांना वितरित केला जातो.
- आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे
- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे / पुणे / नाशिक / नंदूरबार / गडचिरोली / नागपूर / अमरावती / औरंगाबाद.
उदिदष्ट आणि दृष्टीकोन
- लेखाशाखेचे कामकाज मुंबई वित्तिय नियम, महाराष्ट्र आकस्मिक खर्च 1965 व महाराष्ट्र कोषागार नियमावली 1968 अनुसार कामकाज केले जाते.
- वित्त विभागाच्या निर्देशानुसार वित्तिय नियमांच्या मर्यादेत राहून आकस्मिक खर्चाची देयके, संक्षिप्त देयके व योजनानिहाय सर्व प्रकरची देयके आहरण व संवितरण केले करणे.
- लेखाशाखेचे मूळ उदिदष्ट हे वित्तिय शिस्त पाळणे, शासनाच्या निधी ची बचत करणे तसेच काटकसरीचे धोरण पाळून कार्यालयाचे कामकाज सुस्थितीत पार पाडणे असे आहे.
- समन्वय : निधी वितरणाबाबत शासन व अधिन्स्त विभाग यांचेमध्ये आर्थिक बाबी दृष्टीकोनातून समन्वय साध्य करणे.
- आर्थिक पारदर्शकता व गतिमानता – संगणक प्रणाली आधारे वित्तिय तरतूदी आणि देयके पारित करताना पारदर्शकता व गतिमानता साध्य केली जाते.
- वित्तिय अपहार प्रतिबंध– या शाखेमार्फत प्राप्त देयकांची प्रचलित नियमानुसार तपासणी करून कोषागारामार्फत संबंधितांना संगणकीय प्रणालीदवारे प्रदाने केली जातात.
प्रस्तावित योजना
- अंदाजपत्रकिय व्यवस्थापन प्रणाली – संस्थेच्या नव्याने तयार होत असलेल्या संकेतस्थळावर लेखाशाखेसाठी स्वतंत्र अनुज्ञावली तयार करण्याचे काम चालू आहे. सदर अनुज्ञावली मार्फत संस्थेला शासनाकडून प्राप्त होणारे योजना व योजनेतर अनुदान आणि त्याचे वाटप ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणे शक्य होणार आहे. सदर संकेतस्थळ वित्त विभागाच्या बी ई ए एम एस व बी डी एस प्रणालीच्या धर्तीवर एक स्वतंत्र पोर्टल म्हणून कार्यान्वित असेल. वित्तिय वर्ष निहाय प्राप्त वित्तिय तरतूद व खर्चित /अखर्चित निधी बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यामुळे प्रकल्प निहाय / विभाग निहाय प्राप्त वित्तिय तरतूदींचे अवलोकन करणे सुलभ होईल.
- स्वायत्त संस्थेच्या बळकटीकरण व विस्तारीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, प्राप्त निधी खर्च करताना स्वायत्त संस्थेची वित्तिय नियमावली तयार करणेबाबत कार्यवाही करणे.
- अंदाजपत्रकीय तरतूदीनुसार प्राप्त अनुदान व खर्चित रकमा यांचा ताळमेळ मा. महालेखापाल कार्यालय यांचेशी ऑनलाईन घेणे त्याचप्रमाणे स्वायत्त संस्थेचा लेखा प्राधिकृत सनदी लेखापालांकडून तपासून धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडे विहित नमुन्यात सादर करणे.
- वित्तिय औचित्याची सूत्रे यांचे काटेकोरपणे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेचे आर्थिक हित साध्य करणे.
- फलनिश्चती अर्थसंकल्प सादर करणेसाठी खर्चित रकमांबाबत भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल शासनास विहित नमुन्यात सादर करणेबाबत कार्यवाही करणे.
दस्तऐवज अहवाल
टीआरटीआय पावती आणि पावती
आरटीआयची पावती आणि पेमेंट दर्शविणारी विधानांची तपशीलवार माहिती
फाईल प्रकार: पीडीएफ
फाईल आकार: 48.49 केबी