आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) पुणे द्वारा युनिसेक इंडिया संचालित स्थापित वनहक्क व पेसा संसाधन केंद्र.
मुद्रणयोग्य आवृत्तीसाठी येथे क्लिक करा...
आदिवासी समाजामध्ये मध्ये वनहक्क व पेसा या कायद्यां बाबत जाणीवजागृती व्हावी , वनोपज आधारीत महिला बचत गट व वनोपज संकलक गटाचे व्यवसाय उभे करण्याचे उद्देशाने यवतमाळ, गडचिरोली, नंदुरबार वनोपजबाबतचा अभ्यास या संसाधन केंद्राचे माध्यमातून केला जाईल. परिसरात मिळणा-या वनोपजाची व्याप्ती, संकलित वनोपजाचा दर्जा, मुल्यवर्धन व विपणन व्यवस्था विकसित करुन त्याचे संवर्धन व व्यवस्थापन कसे होईल याबाबत चा अभ्यास तसेच वनहक्क प्राप्त व पेसा गावांचे सुक्ष्म नियोजन करून विकास आराखडा या संसाधन केंद्राचे माध्यमातून तयार केला जाईल. आदिवासीची उपजीविका शाश्वत करणेसाठी दोन महत्वपूर्ण कायदयामुळे आदिवासीना बळ मिळाले आहे. वनहक्क कायदा २००६ व पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ पेसा कायदा हे दोन्ही कायदे त्यांचे वनावरील अधिकार व त्यांची रूढी, परंपरा, संस्कृती संवर्धन व जाती पंचायत ला बळकटी देणारे आहे. या दोन्ही कायद्या बाबत आदिवासी मध्ये अधिकाधिक जागृती करून त्यांची क्षमता बांधणी संसाधन केंद्राचे माध्यमातून होणार आहे. वन हक्क व पेसा संसाधन व्यवस्थापन केंद्रात चार विभाग करण्यात आले असून यात वनोपज वरील संशोधन व विकास, प्रशिक्षण व क्षमता बांधणी , व्यवसाय मदत कक्ष तसेच प्रात्यक्षिक युनिट आहे.
उद्घाटन सोहळा क्षणचित्रे...
अ. यवतमाळ केंद्र
युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, यवतमाळ येथील केंद्राचा उद्घाटन सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी सम्पन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. शिवानंद पेढेकर (सहाय्यक आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती) यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी आभासी पध्दतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ब.गडचिरोली केंद्र
दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी वन हक्क व पेसाचे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र आणि शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्रांचे उद्घाटन मा. मिलीश दत्त शर्मा (भा.व.से.) उप वनसंरक्षक वन विभाग गडचिरोली यांचे शुभ हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड (भा.प्र.से.) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी आभासी पध्दतीने उपस्थितांशी संवाद साधला.
उद्घाटन सोहळ्यास सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) आदिवासी विभाग गडचिरोली, वन परिक्षेत्र अधिकारी (उत्तर धानोरा), जिल्हा समन्वयक गडचिरोली आणि युनिसेक इंडिया चे संचालक, प्रकल्प संचालक, आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथिल अधिकारी व कर्मचारी यांचेसह आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
क. शहापूर केंद्र
दि.२१.४.२०२२ गुरुवार रोजी मा. सचिन रेपाळ,(भा.व.से.) उपवन संरक्षक, शहापूर यांच्या शुभ हस्ते वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन व व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा.भाग्यश्री पोले(ACF)मा.जाधव साहेब(ACF)वन विभाग, मा.म्हारसे साहेब(APO)एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय,शहापूर.
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित महिला सदस्य...
ड. नंदुरबार केंद्र
दि.१९ एप्रिल २०२२ रोजी मा.मीनल करनवाल (भा.प्र.से.)(प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी)नंदुरबार यांचे शुभहस्ते युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन संसाधन व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड (भा.प्र.से.) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी आभासी पध्दतीने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.